पोस्ट्स

५०० सूर्य नमस्कार पाच तासात

इमेज
🧘‍♂️ अंतर-मनसाक्षी आणि शारीरिक क्षमतेचा एक अद्भूत प्रवास: आज पूर्ण केले ५०० सूर्यनमस्कार! ☀️ आज २१ जून, म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन. दरवर्षी हा दिवस आपण उत्साहाने साजरा करतो, पण यावर्षी हा दिवस माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला. आज मी स्वतःच्याच शारीरिक आणि मानसिक क्षमतेला एक मोठं आव्हान देण्याचं ठरवलं होतं आणि अत्यंत आनंदाने, अभिमानाने सांगू इच्छितो की, आज मी ५०० सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा टप्पा यशस्वीपणे पार केला! जेव्हा मी आज सकाळी योग mat वर उभा राहिलो, तेव्हा मनात एक धाकधूक होती. ५०० ही संख्या ऐकायला सोपी वाटते, पण त्यासाठी लागणारी शारीरिक ताकद आणि त्याहूनही महत्त्वाचा असलेला मानसिक निर्धार खूप मोठा असावा लागतो. या आधी बऱ्याच वेळा १०८, १५०, २०० वेळा सुर्य नमस्कार घातले आहेत पण आज कुछ तुफानी करते है... It's mindset game !!! मन आणि गतीचा उत्सव पाचशे आवर्तने या पावन साधनेची,एक सुंदर चालती-बोलती प्रार्थना मनाची. 'आंतरराष्ट्रीय योग दिनाचा' हा सुंदर सोहळा,निसटून जातो मग अंधाराचा तो काळा वेढा. सकाळचा सूर्य संथपणे वर येतो, उन्हाळ्याच्या या नभाला प्रकाशाने भरतो. प्...

सिंहगड 30.0

इमेज
आजचा ट्रेक सिंहगड 30 थोडासा वेगळा? ७८ वर्षाचे तरुण भेटलेले आणि माझा जन्म ७८ सालचा 😎 आजच वातावरण गडावर एकदम झकास होते कारण ढग उतरले होते खाली उतरायचा मूड अजिबात नव्हता.... ३ तास वरतीच काढले... कल्याण दरवाज्याकडे गेलोलो... वरतीच पिठलं भाकरी खाल्ले... येताना मधेच दत्ता म्हणाला jio card recharge करून द्या.... बाकी झकास झाला ट्रेक अस वातावरण होत आज आज पहिल्यांदा कोढणेश्वर मंदिर बघितले  सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी पासून वरती 

आजचे नविन मित्र भावेश आणि आयुष

इमेज
आज बस मध्ये चढताना हे दोघे दिसले मला वाटले नेहमीच्या काकांबरोबर आहेत  पण नंतर समजले ते वेगळे आले आहे. बस मध्ये चढताना त्यांनी एका काकांची फोल्डेबल सीडी उचलली कदाचित ते मदत करत होते... बस मधून उतरताना त्यांनी विचारले सिंहगड? हो... कसं जायचे? चला माझ्याबरोबर... पहिल्या पायरी पर्यंत बरोबर होते... पण त्यांनी विचारत बरेच शॉर्ट कट मारत होते... काही वेळेस ते पुढे होते तर काही वेळेस मी पुढे होतो...ते फर्स्ट टाईम आले होते तरी स्पीड फास्ट होता त्यांचा... वर पोहचल्यावर त्यांना विचारले गड बघणार का?  हो म्हणाले... आजचा माझा वेगळा प्लॅन होता कल्याण दरवाज्याकडे उतरणार होतो... त्यांना म्हणालो चला तर... त्यांनी स्प्राउट भेळ खाल्ली आणि मी दोन ग्लास सरबत... त्यांना पुरंदर, राजगड, तोरणा दाखवला... झुझारं बुरुज दाखवला, त्यांना तानाजी कडा आवडला कलावंतीण बुरुज ची हवा पण आवडली... त्यांना सगळा गड फिरवला जाताना त्यांना नाश्ता साठी ऐश्वर्या कडे जायला सांगितले.... आणि मी उतरायला सुरवात केली... साधारण ११.०० वाजले खाली यायला... १ पाणी बॉटल ऊना मुले लगेच संपली... ११.२० बस आली...तो पर्यंत ते दोघे ...

खंडू बचुटे ८-१० ब वर्गमित्र

इमेज
हा खंडू हुशार मित्र म्हणजे वर्गात पहिला येणारा कदाचित १० वी च्या बोर्डात सुद्धा आला असता... आज पहिल्यांदा नाही बऱ्याच वेळा सिंहगडावर भेटला पण आज पोस्ट टाकावी या उदेश्याने... वर चढताना भेटला म्हटला जरा घाईत आहे वर भेटूया पण त्याचा स्पीड माझ्या वरचढ...तो खाली येताना मी अजून चढतच होतो... ये एक सेल्फी घेऊ मित्रांना जळंवायला... त्याने सांगितले आज ४ राऊंड आहेत सिंहगडाचे... बापरे  हे काहीच नाही मागच्या रविवारी १० राऊंड केले सकाळी ४ रात्रभर...🙄 कशासाठी? अरे जून महिन्यात एक स्पर्धा आहे त्यासाठी ती स्पर्धा अजून खतरनाक आहे... ४४ तासात १६० किलोमीटर ट्रेकिंग करायचे... सुरुवात नसरापूर फाटा ते रायगड असे राऊंड मारायचे..🤪🤐 जिंकण्याचे चांसेस १ ते २ टक्के  म्हटलं चांगले आहे कर बिनधास्त आपल्यात अजून ती धमक नाही... बाकीच्या गप्पा झाल्या चल भेटू परत 😀

बस कंडक्टर

अनिल उपडे बस कंडक्टर ...  काल सिंघगडला जाताना स्वारगेट ला उतरलो तर एकाने विचारचले बस गेली का ? कदाचित माझ्या हातातील काठी बघून नक्की वाटले असणार हा  सिंघगडलाच  जाणार ? मी  म्हटले नाही अजून आली ५.४५ ला येते बरोबर तुम्ही पण त्यासाठी थांबला आहे का? तर हो म्हणाले .... कुठून आलात ? भेकराई नगर  तुम्ही कुठून आलात ? मी मगरपट्टा  दर शनिवार रविवार जाता का ? हो शक्यातो शनिवारी..रविवारी विश्रान्ति ... काय काम करता? बस कंडक्टर आहे पमपीत .. अरे व्वा !!! बस कंडक्टर असून गड किल्ले करता का  हो  मित्र नाही का बरोबर ? नाही आवडतं नाही किंवा जमत नाही त्यांना  बरोबर passion लागत त्यासाठी  हो  आमच्या २-३ मित्रांना फोन केला पण कोण उचलत नाही ...एक जण येतो म्हणाला खरा गाडी वर येतो वारजेतून... ...  ५.४५ ला गाडी आली ... चला जाऊ .... गाडीत इनमीन आम्ही ३ माणसं ...सिंघगड ला जाणारी ...  नावं काय तुमचं ? अनिल उपडे !!! बरेच आवडी निवडी समजल्या .... पुस्तक वाचायला आवडत !!! गड किल्ले फिरायला !!! सिंघगडला गेल्यावर पाण्याचे कॅन उचलून पाणवठया वर टाकायला आवडते .....

रायगड पायरी मार्ग

इमेज
रायगड जेवढे मोठे यश तेवढा मोठा गड २१ मार्च २०२६ महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी... ट्रेकची वैशिष्टे • पब्लिक ट्रान्सपोर्ट, बस आणि टम टम • तोरणा आणि राजगड दुर्ग दर्शन रायगडावरून • महादरवाजा • शिरकाई मातेचे मंदिर • जगदीश्वर मंदिर • महाराजांची समाधी • शिलालेख - जो पर्यंत चंद्र सुर्य आहे तो पर्यंत रायगड जिवंत आहे • हिरोजी इंदलकर पायरी • मेघडंबरी • राजसदर • राणीमहाल • धान्यकोठार • टकमक टोक • मनोरे • हत्ती तलाव • गंगासागर तलाव सकाळी स्वारगेटला सव्वा पाचला हडपसर वरून पोहचलो कारण साडे पाच ची बस सुटणार होती महाडची... लेडी कंडक्टरने सांगितले ९ ते ३८ सीट सोडून बसा ते रिसर्व्ड आहेत आता आले का टेन्शन ? पण बाकीचे सीट मोकळे आहेत आह थँक गॉड एकदम पहिले सीट मोकळे होते पण अपंगांसाठी राखीव जागा होती बसलो जे होईल ते होईल... अशा प्रकारे प्रवास चालू झाला... मूळशीत ब्रेकफास्ट ला गाडी थांबली पण मी काय केला नाही... चहा/ कॉफी/पोहे/उपमा यांच्या नादी लागत नाही... एक दहा रुपयाची खारे शेंगदाणा पुडी घेऊन प्रवास चालू झाल...

चैत्र शुद्ध पाडवा सिंहगड

इमेज
सिंहगड.. आज चैत्र शुद्ध पाडवा साजरा करण्यासाठी गेलो होतो सिंहगडावर...१९ मार्च २०२६ वर चढताना सुशिल भेटला...आज पर्यंत १००० वरती सिंहगड सर केला आहे..🫡  पुणे दरवाज्यापाशी गुढी उभारली होती छान वाटले.... आजचा ट्रेक २०.०