खंडू बचुटे ८-१० ब वर्गमित्र

हा खंडू हुशार मित्र म्हणजे वर्गात पहिला येणारा कदाचित १० वी च्या बोर्डात सुद्धा आला असता...
आज पहिल्यांदा नाही बऱ्याच वेळा सिंहगडावर भेटला पण आज पोस्ट टाकावी या उदेश्याने...
वर चढताना भेटला म्हटला जरा घाईत आहे वर भेटूया पण त्याचा स्पीड माझ्या वरचढ...तो खाली येताना मी अजून चढतच होतो... ये एक सेल्फी घेऊ मित्रांना जळंवायला...
त्याने सांगितले आज ४ राऊंड आहेत सिंहगडाचे... बापरे 
हे काहीच नाही मागच्या रविवारी १० राऊंड केले सकाळी ४ रात्रभर...🙄
कशासाठी?
अरे जून महिन्यात एक स्पर्धा आहे त्यासाठी
ती स्पर्धा अजून खतरनाक आहे...
४४ तासात १६० किलोमीटर ट्रेकिंग करायचे...
सुरुवात नसरापूर फाटा ते रायगड असे राऊंड मारायचे..🤪🤐
जिंकण्याचे चांसेस १ ते २ टक्के 
म्हटलं चांगले आहे कर बिनधास्त आपल्यात अजून ती धमक नाही...
बाकीच्या गप्पा झाल्या चल भेटू परत 😀

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चैत्र शुद्ध पाडवा सिंहगड

रायगड पायरी मार्ग