रायगड पायरी मार्ग
रायगड
जेवढे मोठे यश तेवढा मोठा गड
२१ मार्च २०२६
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी...
ट्रेकची वैशिष्टे
• पब्लिक ट्रान्सपोर्ट, बस आणि टम टम
• तोरणा आणि राजगड दुर्ग दर्शन रायगडावरून
• महादरवाजा
• शिरकाई मातेचे मंदिर
• जगदीश्वर मंदिर
• महाराजांची समाधी
• शिलालेख - जो पर्यंत चंद्र सुर्य आहे तो पर्यंत रायगड जिवंत आहे
• हिरोजी इंदलकर पायरी
• मेघडंबरी
• राजसदर
• राणीमहाल
• धान्यकोठार
• टकमक टोक
• मनोरे
• हत्ती तलाव
• गंगासागर तलाव
सकाळी स्वारगेटला सव्वा पाचला हडपसर वरून पोहचलो कारण साडे पाच ची बस सुटणार होती महाडची... लेडी कंडक्टरने सांगितले ९ ते ३८ सीट सोडून बसा ते रिसर्व्ड आहेत आता आले का टेन्शन ? पण बाकीचे सीट मोकळे आहेत आह थँक गॉड एकदम पहिले सीट मोकळे होते पण अपंगांसाठी राखीव जागा होती बसलो जे होईल ते होईल... अशा प्रकारे प्रवास चालू झाला... मूळशीत ब्रेकफास्ट ला गाडी थांबली पण मी काय केला नाही... चहा/ कॉफी/पोहे/उपमा यांच्या नादी लागत नाही... एक दहा रुपयाची खारे शेंगदाणा पुडी घेऊन प्रवास चालू झाला...
९.१५ महाड स्टॅण्ड गाडी थांबली... उतरताना २–३ कंडक्टरना विचारले रायगड गाडी कुठं लागती? समोर लागती अस उत्तर दिलं पण मला काय पटलं नाही.. कदाचित भुकेमुळे..जरा पोटाला शांत करून बसची किंवा बाकी गाडी शोधू...
एक पेर खाऊन हालचालीला सुरवात केली.. दोन तीन टम टम वाल्यांना विचारले रायगड पण नाही म्हणाले...मग विचार केला कंट्रोलर रूम मध्ये विचारले रायगड गाडी किती वाजता आहे? ते म्हणाले दुपारी १२ वाजता... हे राम 🙄 असं म्हणत मी परत एका कंडक्टरला नीट विचारलं बस सोडून दुसरा पर्याय सांगा? तो म्हणाला शिवाजी चौकात जावा तिथून ECCO गाडी सुटते तेवढ्यात एकाने हे ऐकले तो म्हणाला मला पण रायगड किल्ल्यावर जायचे आहे...गौरव नागपूर वरून आला होता २० मार्च च्या चवदार तळे सत्याग्रह च्या ९९ वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमासाठी...
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या २० मार्च १९२७ ला ९९ वर्ष पूर्ण होत होती त्यासाठी महाराष्ट्र च्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती महाडला...
त्याला सर्व सांगीतले आणि चल चौकात १० मिनिटात विचारात पोहचलो.... मध्ये वाटेत एका रिक्षा वालेल्या विचारले रायगड गाडी थांबते? आम्रपाली हॉटेलच्या पाठीमागे थांबतात... हॉटेल तर सापडले पण गाडया दिसत नव्हत्या.... एकच गाडी थांबली होती पण वाटलं नव्हते अशी जूनी गाडी जाऊ शकते रायगडला आधीच एक कपल बसले होते त्यांना विचारले रायगड किल्ल्यावर का? जीव भाड्यांत पडला पण ड्रायव्हर गायब होता... थोड्यावेळाने तो आला या गौरवने त्याला सांगितले आम्हा चौघांचे ७०० रुपये होतील... गाडी १२ सीटरची बसले आहेत फक्त ४ लोकं.... चला जाऊ.... मेन रोडवर आल्यावर एक ७ जणांच कुटुंब बस स्टॅण्ड वर जाताना दिसले ड्रायव्हर हाक टाकली "रायगड" तसे ते कुटुंब पळत सुटले आमच्या गाडी कडे... ड्रायव्हर ने आता क्लिअर केले ७० रुपये च लागतील सगळ्यांना... ड्रायव्हर ने रायगड पायथा पाशी १०.३५ la सोडले...
क्षणाचा विचार न करता गौरव आणि मी गड चालू केला दीड पाऊण तासात आम्ही शिरकाई मंदिरा पाशी होतो...
मी दुसऱ्यांदा आलो होतो पहिल्यांदा माझ्या शाळेच्या मित्रांबरोबर आलो होतो मागच्या वर्षी रोपवे ने....
मनात एकच खंत होती सिंहगड चालू केल्यानंतर रायगड पायरी मार्गाने जायचं ती इच्छा भरून काढली..
गौरव पहिल्यांदा आला होता त्याला सगळा गड फिरवला... मागच्या वेळेस जो गाईड घेतला होता त्याला भेटलो त्याने ओळखले म्हटला कुठेतरी बघितलं आहे तुम्हाला त्याला आठवण करून दिली आमच्या ३२ नंबर शाळेची ट्रिप त्यावेळी आठवले त्याला.....
गौरवला जेवायचा मूड नव्हता आणि मला होता... थोडीफार काकडी खाल्ली आणि गड उतरायला सुरवात केली...२.३० दुपारी खाली आलो...
उतरताना एका आजोबांनी सांगितले महाड ला जायच्या ऐवजी माणगाव ला जा अंतर कमी आणि वेळ कमी लागेल पुण्याला जायला...
गौरव बराच फास्ट जात होता शेवटी आमची चुकामुक झाली...
खाली एक ECCO आली विचारले महाड हो म्हटलं...पण मी एकटाच...तो म्हणाला कुठं जायचं आहे म्हणालो पुणे...तो म्हणाला बस लागली आहे माणगाव ची तिथून जावा... म्हटलं चालेल... असं म्हणत त्याने बस जवळ सोडले पायथ्या पासून ३-४ किलोमीटर पण पैसे नाही घेतले कारण मी एकटाच होतो.. आणि त्याला गाडी भरायला वेळ लागला असता... खरंच कोकण माणसं गोड असतात ती अशी...
पुढचा प्रवास माणगाव ते पुणे गाड्या पटापट मिळत गेल्या ८.४५ ला घरी....
गाडीत भेटलेले कुटुंब बरंच गप्पा मारत होते आणि गौरव.... अशीच माणसं भेटत जावो हीच प्रार्थना....🙏
जय शिवराय 🚩
शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी ॥
#रायगड #छत्रपती #मैत्री #ट्रेक #गड #किल्लेप्रेमी #किल्ले #राजधनी #छत्रपतीशिवाजीमहाराज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा