बस कंडक्टर
अनिल उपडे बस कंडक्टर ...
काल सिंघगडला जाताना स्वारगेट ला उतरलो तर एकाने विचारचले बस गेली का ? कदाचित माझ्या हातातील काठी बघून नक्की वाटले असणार हा सिंघगडलाच जाणार ? मी म्हटले नाही अजून आली ५.४५ ला येते बरोबर तुम्ही पण त्यासाठी थांबला आहे का? तर हो म्हणाले ....
कुठून आलात ?
भेकराई नगर
तुम्ही कुठून आलात ?
मी मगरपट्टा
दर शनिवार रविवार जाता का ?
हो शक्यातो शनिवारी..रविवारी विश्रान्ति ...
काय काम करता?
बस कंडक्टर आहे पमपीत ..
अरे व्वा !!!
बस कंडक्टर असून गड किल्ले करता का
हो
मित्र नाही का बरोबर ?
नाही आवडतं नाही किंवा जमत नाही त्यांना
बरोबर passion लागत त्यासाठी
हो
आमच्या २-३ मित्रांना फोन केला पण कोण उचलत नाही ...एक जण येतो म्हणाला खरा गाडी वर येतो वारजेतून...
...
५.४५ ला गाडी आली ...
चला जाऊ ....
गाडीत इनमीन आम्ही ३ माणसं ...सिंघगड ला जाणारी ...
नावं काय तुमचं ?
अनिल उपडे !!!
बरेच आवडी निवडी समजल्या ....
पुस्तक वाचायला आवडत !!!
गड किल्ले फिरायला !!!
सिंघगडला गेल्यावर पाण्याचे कॅन उचलून पाणवठया वर टाकायला आवडते ...
....
कंडक्टर असून हे सगळे आवडते हे विशेष ...
अहो मी पण माणूस च आहे की .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा