आजचे नविन मित्र भावेश आणि आयुष
आज बस मध्ये चढताना हे दोघे दिसले मला वाटले नेहमीच्या काकांबरोबर आहेत
बस मध्ये चढताना त्यांनी एका काकांची फोल्डेबल सीडी उचलली कदाचित ते मदत करत होते...
बस मधून उतरताना त्यांनी विचारले सिंहगड?
हो...
कसं जायचे?
चला माझ्याबरोबर...
पहिल्या पायरी पर्यंत बरोबर होते...
पण त्यांनी विचारत बरेच शॉर्ट कट मारत होते... काही वेळेस ते पुढे होते तर काही वेळेस मी पुढे होतो...ते फर्स्ट टाईम आले होते तरी स्पीड फास्ट होता त्यांचा...
वर पोहचल्यावर त्यांना विचारले गड बघणार का?
हो म्हणाले... आजचा माझा वेगळा प्लॅन होता कल्याण दरवाज्याकडे उतरणार होतो...
त्यांना म्हणालो चला तर...
त्यांनी स्प्राउट भेळ खाल्ली आणि मी दोन ग्लास सरबत...
त्यांना पुरंदर, राजगड, तोरणा दाखवला... झुझारं बुरुज दाखवला, त्यांना तानाजी कडा आवडला कलावंतीण बुरुज ची हवा पण आवडली...
त्यांना सगळा गड फिरवला जाताना त्यांना नाश्ता साठी ऐश्वर्या कडे जायला सांगितले....
आणि मी उतरायला सुरवात केली...
साधारण ११.०० वाजले खाली यायला...
१ पाणी बॉटल ऊना मुले लगेच संपली...
११.२० बस आली...तो पर्यंत ते दोघे खाली आले...
बस मधून च त्यांना हात केला..
हसले ते.. परत बरोबर म्हणून 😀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा